लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : प्रभात रस्त्यावरील एका इमारतीतील तळमजल्यावरील वाहनांना आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. आगीत पाच दुचाकींसह एक मोटार पूर्णपणे जळाली, तसेच दोन मोटारींनी आगीच झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली आही. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुखरुप सुटका केली. ज्येष्ठ महिला घाबरल्याने त्यांना तातडीने रुग्णलायात दाखल करण्यात आले.
प्रभात रस्त्यावरील कमला नेहरु पार्क परिसरात कृष्णा निवास दुमजली इमारत आहे. रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तळमजल्यावरील दुचाकींनी पेट घेतला. शेजारी लावलेल्या तीन मोटारींना आगीची झळ पोहोचली. दुचाकी, मोटारींनी पेट घेतल्याने इमारतीत मोठा धूर झाला. धुरामुळे सोसायटीतील रहिवासी घाबरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बँब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप यांच्य मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य सुरु केले. जिन्यात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने जवान आगीपासून बचाव करणारा पोषाख परिधान करु आत शिरले. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आणखी वाचा-पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
तळमजल्यावर पेटलेल्या वाहनांवर पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली. जवानांनी एका सदनिकेतून ८० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेसह तीन जणांना शिडीचा वापर करून बाहेर काढले. दुसऱ्या सदनिकेतून चौघांची सुखरुप सुटका केली. आग लागल्याने ज्येष्ठ महिला घाबरली होती. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर यांनी दिली. आगीत पाच दुचाकी आणि एक मोटार पूर्णपणे जळाली आहे. दोन मोटारींना झळ पोहोचली. सोसायटीतील रहिवाशांकडे जवानांनी चौकशी केली. सोसायटीतील तळमजल्यावर एक इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग लावण्यात आली होती, अशी माहिती रहिवाशांनी दिली. आगीत वीजमीटर जळाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, असे त्यांनी सांगितले.