पुणे : कोथरूड येथील भुजबळ टाउनशीप इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील अलिशान सदनिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत नऊ खोल्यांच्या आलिशान सदनिकेतील पाच खोल्या पूर्ण जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चार खोल्या आगीपासून वाचविण्यात यश मिळवले. ज्येष्ठ नागरिकांसह २५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मात्र, प्रचंड धुरामुळे ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. अर्ध्या ते पाऊण तासात आग आटोक्यात आली.

एकलव्य महाविद्यालयाजवळील भुजबळ टाउनशीप इमारतीमधील अकराव्या मजल्यावरील भुजबळ कुटुंबीयांच्या सदनिकेला दुपारी आग लागली. ही घटना घडली तेव्हा घरात चार-पाच जण होते. आगीचे स्वरूप मोठे असल्याने कुटुंबातील सर्वजण बाहेर पडले. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या कोथरूड, एरंडवणा, वारजे, मख्य केंद्र आणि नवले या केंद्रातील सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग मोठी असल्याने इमारतीमधील विद्युत यंत्रणा बंद करण्यात आली. तांडेल अंगल लिपाणे, अमोल पवार, योगेश चव्हाण यांनी तसेच माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे आणि सहकाऱ्यांनी २५ नागरिकांना अकराव्या मजल्यावरून जिन्याने सुरक्षितस्थळी नेले.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी

हेही वाचा >>> पुण्यामध्ये रेल्वे दुर्घटना टळली!; चिंचवड आकुर्डी दरम्यान रुळावर ठेवले होते दगड

यामुळे या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र, प्रचंड धूर निर्माण झाल्याने ज्येष्ठांना श्वास घेताना त्रास झाला. जवानांनी कुंड्या आणि विटांच्या सहाय्याने काचा फोडून धूर बाहेर घालवला. आग मोठी असल्याने पाच खोल्या पूर्णपणे जळाल्या. यामध्ये घरातील फर्निचर, कपडे आणि घरगुती साहित्य जळून खाक झाले. पाण्याचा मारा करून चार खोल्या वाचविण्यात यश आले. शॉट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे, असे अग्निशमन दलाच्या कोथरूड केंद्राचे प्रमुख गजानन पाथ्रुडकर यांनी सांगितले. सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, केंद्र प्रमुख गजानन पाथ्रुडकर आणि प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली.

हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; विभागीय आयुक्त राव यांचे आश्वासन

आगीची वर्दी दुपारी तीन वाजता मिळताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अकराव्या मजल्यावर जाऊन व्हरांड्यात इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेचा शोध घेतला. मात्र, यंत्रणा दिसून आली नाही. जवानांनी घरात प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर घरातील एक दार उघडले. तेथील डक्टमध्ये अग्निशमन यंत्रणा दिसून आली. ही यंत्रणा असलेल्या घरातच आग लागल्याने जवान चक्रावले. नऊ खोल्यांची अलिशान सदनिका साकारताना ही यंत्रणा घरात कशी घेण्यात आली, असा प्रश्न जवानांना पडला होता.