राहुल खळदकर
पुणे : सासवड रस्त्यावरील वडकी गाव परिसरात गादी कारखान्याला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी नाला परिसरात गादी कारखाना आहे. शनिवारी सायंकाळी गादी कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याने घबराट उडाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पुणे अग्निशमन दल, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. आगीत गादी कारखान्यातील कापूस, गाद्या जळाल्या, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.