पुणे : पुणे रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

अग्निशमन मुख्यालय आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. तळमजला अधिक तीन मजले असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक चारमध्ये आग लागली आहे. जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का किंवा कोणी अडकले नसल्याची खात्री केली. या खोलीत राहत असलेल्या तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत पाणी मारून दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान आणि वस्तू जळाल्या. ही आग खोलीतील हिटरमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी

हेही वाचा – पिंपरी : नव्याकोऱ्या तारांगणाला अवघ्या पाच महिन्यांत गळती, घुमटाच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांचा खर्च

हेही वाचा – अधिकाऱ्यांची दिवाळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवाळे

अग्निशमन अधिकारी पंकज जगताप, सचिन चव्हाण, समीर शेख, सुनिल नामे, संजय गायकवाड, जवान भूषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख आदींनी आग आटोक्यात आणली.