लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील वसतिगृहात वीज मीटरला आग लागल्याची घटना घडली. मुलांच्या वसतिगृहात भिंतीच्या बाहेरील बाजूस विद्युत पुरवठयासाठी वापरात असलेला सीटी मीटरने पेट घेतला होता.

मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्याचवेळी तेथील कर्मचारीवर्ग यांनी तातडीने अग्निरोधक उपकरण वापरून आग शमवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दल आणि महावितरण विभागास संपर्क केला होता. जवानांनी घटनास्थळी पाहणी करून आग नियंत्रणात आणली. त्याचवेळी महावितरणकडून पर्वती विद्युत विभागाचे कर्मचारी वेळेत दाखल होत त्यांनीदेखील पाहणी करुन पुढील कार्यवाही केली. या घटनेत सुदैवाने कोणी ही जखमी नाही.

आणखी वाचा-तब्बल ८ कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त; कुठे झाली कारवाई?

या कामगिरीत जनता वसाहत अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक सागर देवकुळे, महेंद्र सकपाळ, उमेश शिंदे, सागर पाटील, विजय वाघमारे यांनी सहभाग घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in the hostel of sir parshurambhau college pune print news rbk 25 mrj
Show comments