पुणे : श्री शिवाजी प्रिपेएटरी मिलिटरी स्कूल संस्थेच्या ओैषधनिर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालयातील प्रयोगशाळेत आग लागली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. संगम पूल परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालायाजवळ (आरटीओ) एसएसपीएमएस संस्थेचे फार्मसी महाविद्यालय आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
महाविद्यालयाच्या इमारतीत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील प्रयाेगशाळेत दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रातील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, फ्रीज जळाले. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
First published on: 02-06-2023 at 17:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in the laboratory of pharmacy college of sri shivaji preparatory military school institute pune print news rbk 25 ysh