सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग शमवली.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या सहाव्या-सातव्या मजल्यावर दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. त्या कामावेळी वेल्डिंग करताना आग लागून धूर येऊ लागला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग शमवली, असे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

Story img Loader