लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात तीन कारखान्यांना शनिवारी दुपारी आग लागली. आगीत कारखान्यातील साहित्य, कच्चा माल जळला. कारखान्याला सुट्टी असल्याने गंभीर दुर्घटना टळली.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
धायरीतील ओैद्योगिक वसाहत लघुउद्योग आहेत. या भागात गाड्यांच्या बॅटरीचा कारखाना, सुटे भाग तयार करण्याचा कारखाना आहे. शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली. पुणे अग्निशमन दलाचे आठ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्याने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश गांगड, प्रकाश गोरे, गजानन पाथ्रुडकर, प्रभाकर उम्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग आटोक्यात आणली. कारखान्याला सुट्टी असल्याने अनर्थ टळला. आगीत कारखान्यातील कच्चा माल, साहित्य जळाले.