पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात आग लागल्याची घटना शनिवारी (२१ मे) दुपारी चार वाजता घडली. आगीत रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनिवारी सकाळपासून रुग्णालयात वीज नव्हती. त्यामुळे जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयाचे सर्व कामकाज सुरू होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बॅटरी बॅकअप रुममध्ये अचानक आग लागली. ही आग क्षणात रुग्णालयात इतर ठिकाणी पसरली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी वेळेत आग विझवण्यासाठी हालचाली केल्या. तातडीने अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाकडून पाच अग्नीबंब दाखल झाले. त्यांनी १५ मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, मध्यवस्तीत असणाऱ्या या रुग्णालयात आग लागल्याने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णालयातही गोंधळाचे वातावरण होते. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. त्यात शनिवार असल्याने रुग्णालयात निम्मेच कर्मचारी कामावर होते. आग लागल्यानंतर नागरिकांच्या सहकार्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही रुग्णांना सुरक्षितपणे थेरगाव रुग्णालयात पाठवण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण : यंदा उन्हाळ्यात अचानक वणव्यांची संख्या का वाढली? मुळात वणवे का आणि कसे पसरतात?

घटनेची माहिती मिळताच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. बाळासाहेब होडगर, अग्निशामक दलाचे प्रमुख किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल आदींनी घटनास्थळी भेट दिली.