पुणे : लक्ष्मीपूजनानंतर रविवारी सायंकाळी शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात पंधरा ठिकाणी आग लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते. रविवारी सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घराच्या छतावर साठलेला पाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या. रविवारी सायंकाळी साडेसात ते रात्री नऊपर्यंत पंधरा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

रास्ता पेठेतील के.ई.एम रुग्णालय, कोथरुडमधील सुतार दवाखान्याजवळ एका दुकानात आग लागली. वडारवाडी परिसरातील पांडवनगर पोलीस चौकी परिसरातील एका घरात आग लागल्याची घटना घडली. कोंढवा बुद्रुक पोलीस चौकीसमोर साठलेल्या कचऱ्यावर ठिणगी पडून आग लागली. नाना पेठेतील चाचा हलवाई दुकानाजवळ एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली. कोंंढव्यातील शिवनेरी परिसरातील घराच्या गच्चीवर आग लागली. वारजे भागातील आदित्य गार्डन सिटी सोसायटीतील सदनिकेत आग लागली. शुक्रवार पेठ पोलीस चौकीसमाेरील एका घरात आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एकापाठोपाठ दूरध्वनी आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त