लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शहरात तीन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. लष्कर भागातील मॉडर्न डेअरीत सोमवारी रात्री आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. पाण्याचा मारा करून वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. छतावर आग फटाक्यांमुळे लागली, अशी माहिती नागरिक आणि डेअरी मालकाने दिली.

आणखी वाचा-पुण्यातील काँग्रेसमध्ये मनोमिलन नाहीच?… स्नेहभोजनाचा बेत रद्द

अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, कैलास शिंदे, रोहित रणपिसे यांनी आग आटोक्यात आणली. सोमवारी रात्री कुमठेकर रस्त्यावर एका सदनिकेत आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मंगळवारी सकाळी कोरेगाव पार्क येथील एका उपहारगृहात आग लागली. आगीत उपहरगृहातील साहित्य जळाले.