पुणे : पुणे शहरातील हडपसर भागातील लोहिया उद्यान जवळील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याची घटना घटना घडली आहे. तर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा-‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहिया उद्यान जवळील भीमाशंकर सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहीती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना मिळताच, काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. तिसर्‍या मजल्यावर दोन नागरिक अडकले होते. त्या दोघांना गॅलरीमधून बाहेर काढण्यात आले. तर या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून आग कशामुळे लागली याबाबतचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. तसेच घटनास्थळी तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire on the third floor of bhimashankar society in hadapsar svk 88 mrj