पुणे : ऐन दिवाळीत चोरट्यांनी लूटमार केल्याची घटना बाणेर रस्ता परिसरात घडली. या भागातील एका फटाका विक्री दुकानात शिरुन काका-पुतण्यांना मारहाण करुन चोरट्यांनी ३० हजारांचे फटाके, मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि त्यांच्या काकांचा बाणेरमधील कळमकर चौकात साईराज फटका विक्री दुकान आहे. फटका विक्री दुकान बंद केल्यानंतर शुक्रवारी रात्री तक्रारदार तरुण आणि त्याचे काका दुकानात झाेपले होते. दुचाकीवरुन तीन ते चार चोरटे पहाटे साडेतीनच्या सुमारास तेथे आले. दुचाकीस्वार चोरटे फटाका विक्री दुकानात शिरले. गाढ झोपेत असलेला तरुण आणि त्याच्या काकांना मारहाण केली. चोरट्यांनी फटाका विक्री दुकानातील ३० हजारांचे  फटाके पिशवीत भरले.

हेही वाचा >>> पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?

तरुणाकडील पैशांचे पाकिट, मोबाइल संच, तसेच ३० हजारांचे फटाके असा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण आणि त्याचे काका जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. विश्रांतवाडीत महिलेचे दागिने चोरी विश्रांतवाडी भागात पादचारी महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. तक्रारदार महिला येरवडा भागात राहायला आहेत. त्या रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील सेवा रस्त्याने निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner pune print news rbk 25 zws