पुणे: सदनिकेतील गॅलरी लावलेल्या लोखंडी जाळीत एक वर्षाचा मुलगा अडकल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळीत अडकलेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंगणे खुर्द परिसरात एका सदनिकेच्या जाळीत एक वर्षाचा मुलगा अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने जाळीत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

जवानांनी अग्निशमन उपकरणांचा वापर केला. मुलाचे डोके सदनिकेतील गॅलरीला लावलेल्या जाळीत अडकले होते. मुलाला वेदना होत असल्याने तो रडत होता. जवानांनी जाळीजवळ मुलाच्या आईला बसविले. कुशलतेने हायड्राॅलिक स्प्रेडर आणि जॅक या उपकरणांचा वापर करुन जवानांनी जाळीत अडकलेल्या मुलाची सुटका केली. मुलाच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनाेमन आभार मानले. जवान अशोक कडू, तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार आदी मदतकार्यात सहभागी झाले.