महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील रकस्थळ गावात घडली. थिगळे यांच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या हल्लेखाेराचा शोध घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले”, हिंदू राष्ट्रसेना प्रमुख धनंजय देसाईंची अजित पवारांवर टीका

हेही वाचा – पुणे : नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका हल्लेखाेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थिगळे शनिवारी रात्री रकस्थळ गावात घरासमोर थांबले होते. त्यावेळी एक हल्लेखोर तेथे आला. ‘तुला माज आला आहे. एकाला संपवलाय, आज तुलाही संपवतो,’ असे म्हणून हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तूल रोखले. हल्लेखाेराने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. हल्लेखोराने थिगळे यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र, गोळी न सुटल्याने थिगळे बचावले. त्यानंतर हल्लेखोराने पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत माजविली. हल्लेखोर पसार झाला. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात घबराट उडाली. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing at mns district president sameer thigale incident in khed taluka pune print news rbk 25 ssb