पुणे : किरकोळ वादातून एकाने पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कोंढव्यातील एका उपहारगृहाजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट

potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
Raj Thackeray and Uddhav Thackeray Came Together
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Gang terror in Warje area, Attack on youth with axe ,
पुणे : वारजे भागात टोळक्याची दहशत; तरुणावर कोयते, कुऱ्हाडीने वार
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
Hanumangargh Betting On Dog Fight News
Dog Fight : धक्कादायक! विदेशी कुत्र्यांवर खेळला जात होता सट्टा; ८१ जणांना अटक; १९ कुत्र्यांसह १५ वाहने जप्त

हेही वाचा – पुणे : वारजे भागात टोळक्याची दहशत; तरुणावर कोयते, कुऱ्हाडीने वार

याप्रकरणी अब्दुला उर्फ बकलब कुरोशी (रा. सय्यदनगर, महंमदवाडी) याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात करीमस् कॅफे येथे शनिवारी रात्री ताहा शेख, नोमान पठाण, अब्दुला आणि आणखी एकजण जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अब्दुला याची मैत्रीण तेथे आली. अब्दुला आणि त्याची मैत्रीण थोड्या अंतरावर उभे राहून बोलत होते. त्यावेळी तिघे जण तेथे आले. अब्दुला आणि त्याच्या मैत्रिणीला रस्त्यात बोलत थांबू नका, असे त्यांनी सांगितले. या कारणावरुन अब्दुला आणि तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तैमुरअली पठाण (रा. गल्ली क्रमांक १४, सय्यदनगर, हडपसर) याने मित्रांना बोलावून घेतले. दहशत माजविण्यासाठी त्यांनी तलवार उगारली, तसेच सिमेंटच्या गट्टूने करिमस् कॅफेसमोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यावेळी अब्दुलाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, अब्दुलाने पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

Story img Loader