पुणे : बोपदेव घाटातील ट्रिनिटी महाविद्यालयाजवळ शनिवारी गोळीबार झाल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परिसरात पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना कळवली. त्यानंतर स्थानिक पोलिसांबरोबरच शहर गुन्हे शाखेचे पथक तेथे पोचले. त्यांनी तेथे शोध घेतल्यावर एक पुंगळी सापडली. ती पुंगळा नेमकी पिस्तुलाची आहे, की एअर गनची, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती तपासणीसाठी तज्ज्ञांकडे सोपवण्यात आली आहे. तसेच या परिसरात चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा – दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, राज्य मंडळाने केली घोषणा

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र कुलगुरू निवडीवर विजय वडेट्टीवार यांची टीका, नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी

या घाटामध्ये जोडप्यांना लुबाडण्याचे, तसेच बेकायदा शस्त्रांचा गोळीबार केल्याचे गुन्हे या पूर्वी दाखल करण्यात आले आहे. बोपदेव घाटाच्या परिसरामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये एका व्यावसायिकावर गोळीबार झाला. तपासामध्ये त्याबाबतची फिर्याद खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, डिसेंबर २०२२ मध्ये त्या भागात झालेल्या गोळीबारामध्ये गणेश नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी) हा तरुण मृत्युमुखी पडला. दारूच्या नशेत पिस्तुलातून चुकून गोळी उडाल्याने हा प्रकार घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in the college area of kondhwa pune print news rbk 25 ssb
Show comments