पुणे : उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने रखवालदारावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत रखवालदार जखमी झाला नाही. मोटारीतून पसार झालेल्या आरोपींनी दगड फेकून मारल्याने रखवालदाराची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपीने पिस्तूल बेकायदा बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी भानूदास शेलार, अजय मुंढे, सतीश उर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. रखवालदार अक्षय साहेबराव चव्हाण याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत रखवालदार चव्हाण याची पत्नी शीतल जखमी झाली.

Massive infiltration into India from Bangladesh BJP Union Ministers claim
‘बांगलादेशातून भारतात प्रचंड घुसखोरी’, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajeshwar Chavan
Rajeshwar Chavan : संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या जिल्हाध्यक्षांची सीआयडी चौकशी; म्हणाले, “राजकारणात…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
retired army soldier firing
पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून एकावर गोळीबार; टेम्पो चालकाचा मृत्यू, येरवड्यातील घटना
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”

हेही वाचा >>> भंगार दुकानातील कॉम्प्रेसरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हाॅटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा रखवालदार आहे. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तेथे राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मोटारीतून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. रखवालदार चव्हाणने त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. चव्हाणला मारहाण करुन त्याला दगड फेकून मारला. चव्हाणची पत्नी शीतलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्याने तिचे डोके आणि पायाला दुखापत झाली. आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. दैव बलवत्तर होते म्हणून तो बचावला. चव्हाणने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक करणकोट यांनी दिली.

Story img Loader