पुणे शहारातल्या मध्यवर्ती भागातील शुक्रवार पेठ परिसरात एका तरुणावर दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. भरदिवसा हा प्रकार घडल्याने या भागात भीतीचे वातावरण आहे. यामध्ये संबंधीत तरुण जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यामध्ये तो जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये अज्ञातांकडून हा गोळीबार करण्यात आला. गोळीबारच नव्हे तर कोयत्याने वार देखील करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून कळते.

दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. भर दुपारी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. जखमी तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेतील मंगेशने घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतः जाऊन माहिती दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing on youth in pune central area use of sharp weapons by the perpetrators
Show comments