जमिनीच्या वादातून नेरे दत्तवाडीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.विकास राजपूत (रा. भोसले वस्ती, माण), कार्तिक ठाकूर (रा. आकुर्डी), पृथ्वीराज राठोड (रा. चाकण), ज्ञानेश्वर राजपूत (रा. वाडेबोल्हाई) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी यश मारवाडी (वय-२६, रा. नेरे दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
हेही वाचा >>>पुणे : महापालिकेने केलेल्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करा ; काँग्रेसची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी १० वाजता नेरे येथील शिव कॉलनीत वादाची ही घटना घडली. यावेळी फिर्यादीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी फिर्यादीच्या हाताला घासून गेली. त्यामुळे ते जखमी झाले. ‘आता वाचलास, पुन्हा सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक काकडे पुढील तपास करत आहेत.