लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: मजा म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या अंगलट आले. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तेजस गोंधळे (वय २९, रा. तेजदीप निवास, गोंधळेनगर, हडपसर.), अजिंक्य मोडक (वय ३४, रा. फुरसुंगी), चेतन मोरे (वय २४, रा. तुकाई दर्शन) यांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस, अजिंक्य आणि चेतन सिंहगड परिसरात फिरायला गेले होते. तेथून परतत असताना तिघे जण खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ थांबले. तेथे पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज परिसरातील उपहारगृहचालक आणि नागरिकांनी ऐकला. त्यांनी हवेली पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
आणखी वाचा- पुणे: अक्षय्य तृतीयेला बाजारात आंब्यांचा तुटवडा; हवामान बदलांमुळे हापूसच्या आवकमध्ये कमालीची घट
गोंधळे, मोडक, मोरे मोटारीतून निघून गेले. परिसरातील नागरिकांनी वाहनांचा क्रमांक टिपून ठेवला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना मोटारीचा क्रमांक मिळाल्यानंतर तातडीने तपास सुरु करण्यात आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा पिस्तूल बाळगणारा तेजस याच्याकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी शस्त्र परवान्याबाबत सखोल चौकशी केली. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करुन दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते तपास करत आहेत.