प्रसिद्ध व्याख्याते नामदेव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले. यानंतर शरद पवार गटाने शरद पवारांचा खरा दाखल समोर आणत नामदेव जाधवांना प्रत्युत्तर दिलं. स्वतः शरद पवारांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. मात्र, या प्रकाराचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. शनिवारी (१८ नोव्हेंबर) शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमाला विरोध केला. तसेच ते माध्यमांशी बोलत असतानाच त्यांच्या तोंडाला काळे फासले. यावर आता नामदेव जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नामदेव जाधव म्हणाले, “याला रोहित पवार जबाबदार आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी करणं शोभणारं नाही. हे सर्व १०० टक्के रोहित पवारांनी करायला लावलं आहे. या प्रकारानंतर तक्रार कुणाविरोधात करायची याबाबत मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे.”

नेमकं काय घडलं?

नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. यानंतर भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : VIDEO: शरद पवार समर्थकांनी नामदेव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं

या घडामोडींनंतर नामदेव जाधव नवी पेठ येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अचानक पवार समर्थकांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले. पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.