पिंपरी : दिल्ली – मुंबई आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाच बुकींना पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई चिंचवड – लिंक रोड येथे मंगळवारी (दि. ११) रात्री पावणेनऊला करण्यात आली.

गोविंद प्रभुदास लालवानी (वय ४५, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय ६१, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), देवानंद प्रतापराय दरयानी (वय ५१, रा. तानाजीनगर, चिंचवडगाव), रमेश दयाराम मिरानी (वय ६३, रा. पिंपरी), हरेश हनुमंत थटाई (वय ५८, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक सागर अवसरे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
suspense thriller movies on ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ थरारक सस्पेन्स थ्रिलर सिनेमे, चित्रपटांच्या रहस्यमय कथा ठेवतील खिळवून; पाहा यादी
during assembly election police deployed to maintain law and order
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
govinda misses diwali celebration
गोविंदाने साजरी केली नाही यंदाची दिवाळी, कारण सांगत पत्नी सुनीता आहुजा म्हणाली…
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Chief Minister Eknath Shinde started campaigning for assembly elections in Mumbai print politics news
मुंबई झोपडीमुक्त करणार- मुख्यमंत्री

मंगळवारी रात्री दिल्ली विरुद्ध मुंबई असा आयपीएलचा सामना होता. या सामन्यावर आरोपी बेटिंग घेत होते. फोनवर बेटिंग लावली जात होती. लिंक रोड येथे मेट्रोपोलिटन सोसायटीतील एका सदनिकेत क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दोन संगणक, मोबाइल आणि इतर साहित्य असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फौजदार माने तपास करत आहेत.