आज सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांनी अनेक वर्षांपासून महापालिकेने सोपविलेली कामे व जबाबदा-या प्रामाणिकपणे पार पाडत उत्तम कामकाज केले आहे. यासारख्या अधिकारी, कर्मचा-यांमुळे महापालिकेस ई- गव्हर्नन्स, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा अशा विविध क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे पुरस्कार मिळत आहेत. असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे मार्च २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २१ आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या ६ अशा एकुण २७ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक,विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा खरात, मुख्याध्यापक महिपती पाटील, मुख्य लिपीक मनोजकुमार खोपडे, सिस्टर इन्चार्ज अंजली आपटे, बी.सी.जी टेक्निशियन भास्कर ढोरे, ऑपरेटर अशोक चव्हाण, बाळासाहेब मालुसरे, उपशिक्षक विजया सोनटक्के, पौर्णिमा देवरे, रसिका देव, वीजतंत्री देविदास महाजन, रखवालदार वसंत चिमटे, वॉर्डबॉय किशोर राजमाने, तुकाराम लांडगे, शिपाई कृष्णा पाटील, मजूर आसफखॉ पठाण, राजू काळभोर, माळी सुनिल गाटे, सफाई कामगार नंदा गंगावणे आदींचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सहाय्यक उद्यान निरीक्षक संदीप गायकवाड, उपशिक्षक अंजली देवडकर, मुकादम कैलास कांबळे, अशोक सोनटक्के, सफाई सेवक गोपाळ सुर्यवंशी यांचा समावेश आहे.