गुंतवणूक केल्यास रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५ कोटी ८४ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुंदन दत्तात्रय ढाके, सुनील झांबरे, चंद्रशेखर अरूण चौधरी, पंकज प्रल्हाद चौधरी, किरण गिरीधर चौधरी, मुकेश अशोक कोल्हे व एक महिला (सर्व सिध्दीविनायक ग्रूप कंपनी, आकुर्डी) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
या प्रकरणी मिलिंद मधुकर चौधरी (वय-५१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०१७ ते ऑक्टोबर २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे चौधरी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्कम तिप्पट करून देतो, असे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादी चौधरी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले.
हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर ; दिवाळीनिमित्त पुणे-नागपूर मार्गावर धावणार जादा ‘शिवनेरी’
त्यांच्याकडून ८ टप्प्यात ६ कोटी ३४ लाख रूपये घेतले. त्यापैकी अवघे ५० लाख रूपये आरोपींनी परत दिले. मात्र, उर्वरित ५ कोटी ८४ लाख रूपये आरोपींनी फिर्यादीला आजपर्यंत परत दिलेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खुळे करत आहेत.