पुणे : घोरपडे पेठेतील जुन्या वाडाला गुरुवारी पहाटे आग लागली. आगीत पाच घरे आणि दुकानाला झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.घोरपडे पेठेतील पंचहौद टॉवरजवळ दुमजली जोशी वाडा आहे. गुरुवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास वाड्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेतील ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभय?

अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासह, कसबा, एरंडवणे, गंगाधाम केंद्रातून पाच बंब, २ टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आली. घरात वरच्या मजल्यावर मोट्या प्रमाणावर कपड्यांचा साठा करुन ठेवण्यात आला होत. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन पाऊण तासात आग आटोक्यात आणली. वाड्यातून दोन सिलिंडर बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five houses and a shop destroyed due to fire incident in ghorpade peth pune print news rbk 25 zws