पुणे : पीएमपी प्रशासनाने पाच रुपयांमध्ये पाच किलोमीटर अंतरातील प्रवास योजनेअंतर्गत सुरू असलेले उर्वरित २८ मार्गही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही सेवा कायमस्वरुपी बंद झाली आहे. मार्गांचे उत्पन्न, प्रवासी संख्या यांचा विचार करता प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने पीएमपी प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पीएमपीने २५ ऑक्टोबर २०२० पासून पाच किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये तिकीट आकारणी सुरू केली होती. त्यासाठी ५६ मार्ग निश्चित करण्यात आले होते. परंतु, काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्यामुळे २८ मार्गांवर ही सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, बस वाहतुकीसाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता ५ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये तिकीट आकारणीमुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत होते. त्यातून संचलनातील तूटही वाढत होती. त्यामुळे या २८ मार्गावरही सुरू असलेली सेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. बंद करण्यात आलेल्या मार्गांवर १९ फेब्रुवारीपासून नेहमीच्या दराने तिकीट आकारणी होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…

हेही वाचा – स्वदेशी प्रजातीचे देखणे अश्व पाहण्याची संधी, पुण्यात शनिवारपासून दोन दिवस ‘मारवाडी हॉर्स शो’

हेही वाचा – पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, महापालिका आयुक्तांचे राज्य शासनाला पत्र

स्वारगेट-पुणे स्थानक-ताडीवाला रस्ता, स्वारगेट- महात्मा गांधी बसस्थानक-पुलगेट-शीतल पेट्रोल पंप, नरवीर तानाजी वाडी-डेक्कन-गोखलेनगर, नरवीर तानाजी वाडी-डेक्कन-गोखलेनगर, कोथरूड-गुजरात काॅलनी-कोथरूड स्टॅण्ड (वर्तुळ), कोथरूड-गालिंद पथ-दांगट वस्ती, कोथरूड-कर्वेनगर (गार्डन सिटी)-कर्वेनगर (वर्तुळ), कोथरूड-बावधन-कोथरूड डेपो (वर्तुळ), कात्रज-जांभुळवाडी, कात्रज-नऱ्हेगांव, कात्रज-गुजरवाडी, कात्रज-येवलेवाडी, कात्रज-वाघजाईनगर, हडपसर-सासवड रस्ता रेल्वे स्तानक, हडपसर-महंमदवाडी, हडपसर-फुरसुंगी, हडपसर-मांजरी बुद्रुक, हडपसर-संकेतविहार, मुंढवा चौक-मांजरी बुद्रुक, अप्पर डेपो- मार्केटयार्ड (सुखसागरनगर)- मार्केटयार्ड (वर्तुळ), अप्पर डेपो- कात्रज कोंढवा रस्ता- अप्पर डेपो, निगडी-रुपीनगर-निगडी, निगडी- खंडोबामाळ-चिखली, भोसरी-दिघी, भोसरी- चऱ्होली गांव-आळंदी, पिंपरी-चिंचवड गांव-वाल्हेकरवाडी, बालेवाडी- चिंचवडगांव- आकुर्डी रेल्वे स्थानक या मार्गांवरील पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवासी ही योजना बंद करण्यात येणार आहे.