लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये पर्यटक हे थेट भुशी धरणात वाहून गेले. यात लहान मुले, महिलांचा समावेश आहे. त्यांचं शोधकार्य सुरू आहे. अन्सारी कुटुंब असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लोणावळ्यात वर्षाविहासाठी गेलेले पाच जण वाहून गेले आहेत. अन्सारी हे कुटुंब भुशी धरणाच्या वर असलेल्या जंगलात वॉटर फॉल (बॅक वॉटर) येथे वर्षाविहाराचा आनंद घेत होते. तेव्हा, पाच जण या वॉटर फॉलमधून भुशी धरणात वाहून गेल्याचे लोणावळा पोलिसांनी माहिती दिली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झालं असून पर्यटकांची गर्दी होत आहे.
लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटर फॉलमध्ये पर्यटक हे थेट भुशी धरणात वाहून गेले. यात लहान मुले, महिलांचा समावेश आहे. pic.twitter.com/gru1P86MQH
— LoksattaLive (@LoksattaLive) June 30, 2024
हेही वाचा – गृहिणींना दिलासा… पालेभाज्यांच्या दरात किती घट झाली?
धरणात वाहून गेलेल्या महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेच वय ३६ तर दोन्ही मुलींचं वय हे १३ आणि ८ वर्षे आहे. इतर ४ वर्षाची मुलगी आणि ९ वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली होती.