पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेत पाच नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे. आता या पाच नावांतून एक नाव कुलगुरू म्हणून जाहीर करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेत समितीने २७ इच्छुकांच्या मुलाखती १८ आणि १९ मे रोजी घेतल्या. त्यानंतर पाच नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला सादर करण्यात आली. या पाच नावांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार, डॉ. संजय ढोले, डॉ. पराग काळकर यांच्यासह कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी यांचा समावेश असल्याचे कळते. आता २६ मे रोजी या पाच जणांशी संवाद साधल्यानंतर एकाचे नाव कुलगुरू म्हणून जाहीर करण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी पाच नावांची शिफारस
२६ मे रोजी या पाच जणांशी संवाद साधल्यानंतर एकाचे नाव कुलगुरू म्हणून जाहीर करण्यात येईल
Written by लोकसत्ता ऑनलाइन
![savitribai phule pune university](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/05/pune-uni.jpg?w=1024)
First published on: 20-05-2023 at 23:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five names recommended for vc selection of savitribai phule pune university pune print news ccp14 zws