लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कोंढवा भागातील वडाची वाडी परिसरात भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार वडील जखमी झाले आहेत.

st bus accident pune solapur
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू; बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Suspicious death of eight-year-old girl in Mokhada
मोखाडा येथे आठ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू
prakash raj son death
पाच वर्षीय मुलाच्या आकस्मिक निधनाने खचले होते प्रकाश राज, म्हणाले, “दुःख वाटण्यापेक्षा…”
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
Pune Kalyani Nagar porsche accident case, trial
कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता
son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
lightening strike on front of man while he shooting in mobile shocking video goes viral on social media
मरण इतक्या जवळून कधी पाहिलंय का? घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा VIDEO पाहूच नका

या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गाथा इंद्रजीत यादव (वय ५ ) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार इंद्रजीत बंडोपंत यादव (वय ३९, रा. ॲरोनेस्ट सोसायटी, वडाचीवाडी ) जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण जालिंदर मांढरे (वय ३२, रा. वडाचीवाडी, उंड्री, कोंढवा) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत यादव हे ग्रामसेवक आहेत. यादव आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी गाथा दुचाकीवरुन निघाले होते. काळुबाई मंदिरासमोर भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार यादव आणि त्यांची मुलगी गाथा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान गाथाचा रुग्णालयात मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटारचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.