पिंपरी : राज्याच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत वाढ होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात फलक झळकले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फलक लावले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शगुन चौक आणि इंदिरा गांधी उड्डाण पुलावर असंघटित कर्मचारी कामगार संघ काँग्रेसच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर भावी मुख्यमंत्री नानाभाऊ पटोले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची भर पडली आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: निगडीत मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार; आरोपी अटकेत
विधानसभा निवडणुकीला दीड वर्षांचा अवधी आहे. महाविकास आघाडीने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष्याच्या नेत्यांचे आतापासूनच भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकू लागले आहेत.