पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी एक लाख ७२ हजारांनी विजयाचा दावा केला असून त्यांच्या विजयाचे फलक लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळमध्ये महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारणे आणि वाघेरे या दोघांकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. वाघेरे यांनी कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड या पाच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एक लाख ७२ हजार मतांनी विजयी होईल, असा दावा केला आहे. तर, बारणे यांना केवळ पनवेलमधून आघाडी मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – डेंग्यूचा धोका वाढला! जाणून घ्या रोगाची लक्षणे अन् प्रतिबंधाविषयी…

हेही वाचा – धक्कादायक: पोलीसांच्या ताब्यातील आरोपी रेल्वेतून उडी मारून पसार

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. निकालाला २० दिवस बाकी असतानाच संजोग वाघेरे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे यांच्या समर्थकांनी ‘खासदार’ असा उल्लेख असलेले फलक लावले आहेत. ‘खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित…घासून नाही ठासून हाणली… संजोग वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flex politics of sanjog waghere supporters victory banner were put up in this area pune print news ggy 03 ssb
Show comments