‘आययूसीएन’च्या अतिधोक्याच्या यादीत समावेश; संवर्धनाची तीव्र निकड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चिन्मय पाटणकर

पुणे : पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ असलेल्या सोनघंटा या वनस्पतीच्या धोक्याचे मूल्यांकन इंटरनॅशनल यूनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानकांनुसार करण्यात आले आहे. त्यामुळे सोनघंटा या वनस्पतीचा समावेश आययूसीएनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये झाला असून, आता या वनस्पतीच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. आययूसीएन या संस्थेतर्फे अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पती, प्राणी, पक्षी आदींची यादी प्रकाशित केली जाते. जागतिक पातळीवर तज्ज्ञांकडून मूल्यमापन करून संबंधित प्रजातीचा यादीत समावेश केला जातो. सोनघंटा वनस्पतीचा शोध १८८९ मध्ये रानडे नामक वनस्पतिशास्त्रज्ञाने सर्वप्रथम लावला. त्यामुळे त्यांच्याच नावाने ही वनस्पती ‘अॅबिटय़ुलॉन रानडी’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. तर मराठीमध्ये तिला सोनंघटा म्हटले जाते.

सोनघंटा वनस्पतीच्या ‘रेडलिस्ट’मधील समावेशाबाबत वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार  म्हणाले, की सोनघंटा ही वनस्पती स्थानिक पातळीवर धोक्यात असल्याचे पूर्वीच सिद्ध झाले आहे. मात्र वनस्पती धोक्याच्या पातळीवर असल्याचे जागतिक पातळीवर सिद्ध होण्यासाठी तिचा रेड लिस्टमध्ये समावेश होणे आवश्यक असते. संशोधन प्रकल्पातील संशोधक आदित्य गडकरीने जवळपास वर्षभर फिरून या वनस्पतीची माहिती संकलित केली. त्यानंतर या माहितीचे मूल्यमापन करण्यात आले.   या वनस्पतीवर टिश्यमू कल्चरच्या माध्यमातून तिची वाढ करून शोभिवंत वनस्पती म्हणून तिचा अधिकाधिक प्रचार केल्यास संवर्धनासाठी मदत होऊ शकेल.आघारकर संशोधन संस्थेतील वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार आणि आदित्य गडकरी यांनी या संदर्भातील अभ्यास केला. आययूसीएनकडून पश्चिम घाटातील प्रजातींच्या जतनासाठीचा विशेष गट स्थापन केला आहे. ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा वाटवे या गटाच्या संयोजक आहेत.

शंभर वनस्पतींचे मूल्यमापन

पश्चिम घाटातील सुमारे दहा ते बारा वनस्पतीच रेडलिस्टमध्ये आहेत. त्यात सोनघंटासह कोरंटी, चेर अशा काही वनस्पतींचा समावेश आहे. मात्र या संदर्भातील माहिती पुरेशी नसल्याने संपूर्णपणे नव्याने अभ्यासाची आवश्यकता आहे. अस्तित्वाला धोका असण्याचे कळणे हेच संवर्धनाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे अस्तित्व धोक्यात असलेल्या वनस्पतींना प्रयम्त्नपूर्वक त्या यादीतून बाहेर काढले पाहिजे, त्यांचे प्राधान्याने संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठी अशा वनस्पतीचे जागतिक पातळीवर लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे. जेणेकरून संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न होऊ शकतील. सध्या पश्चिम घाटातील सुमारे शंभर वनस्पतींचे अशा प्रकारे मूल्यमापन करण्यात येत आहे, असे रेड लिस्ट प्राधिकरण समन्वयक डॉ. अपर्णा वाटवे यांनी सांगितले.

थोडी माहिती..

सोनघंटा ही वनस्पती तोरणा, राजगड, वासोटा, आंबा घाट अशा काही ठिकाणी आढळते. पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ अशी ही वनस्पती आहे. ही वनस्पती शोभिवंत आहे. या वनस्पतीचे फुल अतिशय देखणे असते. तसेच स्थानिक पर्यावरणाचाही ती घटक आहे.