दत्ता जाधव, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : करोनातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना युक्रेन-रशिया युद्धामुळे अन्नधान्यांच्या महागाईचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाई दराने गेल्या ४१ वर्षांतील उच्चांक गाठला आहे, अमेरिकेत महागाई ९.१ टक्क्यांवर गेली आहे, तर तुर्कीचा महागाई दर ७८.६ टक्क्यांवर गेला आहे. जागतिक अन्न दर निर्देशाक २३.१ टक्क्यांवर गेला आहे. अखंड जग महागाईत होरपळत आहे. गरीब आफ्रिकी देशांची अन्नसुरक्षाच अडचणीत आली आहे.
इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशनच्या (आयसीआरआयईआर) जुलै महिन्याच्या अंकात या विषयी सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. करोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेचा परिणाम म्हणून जगभरात अन्नधान्यांची महागाई झाली होती. त्यातून जगभरातील अर्थव्यवस्था सावरत असतानाच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून ७७ टक्के देशांत महागाईचा आगडोंब उसळला आहे. भारतातील महागाई ७.०१ टक्क्यांवर गेली आहे. अमेरिकेतील महागाईने मागील ४१ वर्षांतील उच्चांक गाठला असून, अमेरिकेतील महागाई ९.१ टक्क्यांवर गेली आहे. ब्राझीलमधील महागाई ११.९ टक्क्यांवर आहे. संपूर्ण युरोपीयन महासंघात महागाई दर ८.६ टक्क्यांवर, ब्रिटनमध्ये ९.४ टक्क्यांवर तर तुर्कस्तानमधील महागाई ७८.६ टक्क्यांवर गेली आहे. विकसित देशांतील अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यकर्त्यांना या महागाईने अस्वस्थ करून टाकले आहे.
तर दुसरीकडे गरीब आफ्रिकी देशांत पोटभर अन्नासाठी मारामार सुरू आहे. इतका सगळा अनर्थ फक्त युक्रेन-रशिया युद्धाने केला आहे.
युद्धामुळेच महागाईच्या झळा
जागतिक अन्न संघटनेने अन्न दर निर्देशांक विक्रमी २३.१ टक्क्यांवर गेल्याचे म्हटले आहे. या महागाईला युद्धच जबाबदार आहे. युद्धामुळे वाहतूक आणि निर्यात प्रभावीत झाली आहे. जगाच्या एकूण गरजेपैकी सुमारे २५ टक्के गहू आणि खाद्यतेल ही दोन राष्ट्रे पुरवितात. युद्धामुळे २०२० च्या तुलनेत आज गव्हाच्या दरात १३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पामतेलाच्या दरात १०९ टक्के, सोयाबीन तेलाच्या दरात ९९ टक्के, सरकी तेल ९३ टक्के, सूर्यफूल तेल ८२ टक्क्यांनी वाढले आहे. या शिवाय अन्य क्षेत्रांतील महागाई कंबरडे मोडणारी आहे. कच्चे खनिज तेल २०१ टक्के, नैसर्गिक गॅस ६८९ टक्के, चिकन-मटण १३४ टक्क्यांनी महाग झाले आहे. या जबर महागाईमुळे जगभरातील ग्राहकांचे खिसे रिकामे होत आहेत.
शेतीवर महागाईची टागंती तलवार
रशिया, युक्रेन आणि बेलारुस ही रासायनिक खते आणि रासायनिक खतांसाठी कच्चा माल पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. युद्धामुळे उत्पादन, वाहतूक बंद असल्याचा परिणाम म्हणून युरिया २४२ टक्क्यांनी महागला आहे. इतर खतांच्या किमतीत सरासरी ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकी महागडी खते वापरणे जगभरातील शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळे पुढील वर्षांतील शेतीमालाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे आणि जर खतांवर अनुदान दिले तर संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होणार आहे, अशा कात्रीत जगभरातील देश अडकडले आहेत.
देशनिहाय महागाई दर (टक्क्यांत)
तुर्कस्थान ७८. ६,
अर्जेटिना ६०.७,
सुदान १९२,
श्रीलंका ५४.६,
इराण ५२.५,
इथिओपिया ३४,
नायझेरिया १७.७,
रशिया १५.९,
अमेरिका ९.१,
ऑस्ट्रेलिया ५.१,
जर्मनी ७.६,
भारत ७.०,
चीन २.५