पुणे: आशिया खंडातील देशांमध्ये अन्नाची असुरक्षितता वाढली आहे. करोनाच्या काळात बहुतेक देशांनी कृषी क्षेत्र आणि अन्न पुरवठा साखळी सक्षम राहण्याला प्राधान्य दिले. तरीही हा प्रदेश सर्वाधिक अन्न असुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या कृषी खात्याने इंटरनॅशनल फूड सिक्युरिटी ॲसेसमेंट, २०२२-३२ या अहवालात व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका

nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
milk adulterants, Maharashtra , milk samples, milk,
राज्यभरातून एका दिवसांत ११०० दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Cotton production, Cotton bales, textile industry,
कापूस उत्पादन ३०४ लाख गाठींवर जाणार, कापड उद्योगाला मोठा दिलासा; जाणून घ्या कॉटन असोशिएशन ऑफ इंडियाचा अंदाज
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

हेही वाचा >>> पुण्यात सकाळपासून पावसाची रिपरिप; शाळेला जाणाऱ्या मुलांची, पालकांची उडाली तारांबळ

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण झाल्याचे ग्लोबल हंगर इंडेक्सने निदर्शनास आणून दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कृषी विभागाचा हा अहवाल काळजीत भर टाकणारा आहे. अहवालात म्हटले आहे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये २६.६ टक्क्याने अन्न असुरक्षा वाढली आहे. आशियात अन्नधान्यांचे मुबलक उत्पादन होत असले तरी आणि या भागात लोकसंख्या प्रचंड असली तरीही अन्न असुरक्षेमागील प्रमुख कारणे अन्नधान्यांची महागाई, विस्कळीत पुरवठा साखळी, कुमकुवत वाहतूक व्यवस्था, सामान्य लोकांचे कमी आर्थिक उत्पादन, देशांचा घसरलेला आर्थिक वृद्धी दर आणि करोना साथ ही प्रमुख कारणे आहेत.

हेही वाचा >>> कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा राज्य शासनाचा घाट धोकादायक; अजित पवार यांचे मत

रशिया-युक्रेन युद्ध कळीचा मुद्दा

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन आणि खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. प्रामुख्याने खतांच्या किमतीत १५० ते २०० पटीने वाढल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यांच्या किमतीत विक्रमी वाढ झाली. त्यामुळे आशियातील अन्न असुरक्षेत भर पडली आहे. या युद्धामुळे आशियामधील अंदाजे २ कोटी ८९ लाख दशलक्ष लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यात दक्षिण आशियातील (भारतीय उपखंड) २ कोटी १९ लाख लोकांचा समावेश असून, हे प्राधान्याने भारतातील लोक आहेत.

हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

अन्न असुरक्षा कमी होण्याची शक्यता

सन २०३२ पर्यंत ही अन्न असुरक्षा कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. आशिया खंडातील देशांचे दरडोई उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे अन्न असुरक्षित लोकांची संख्या कमी होईल. दरवर्षी ४.५ टक्के दराने ही अन्न असुरक्षा कमी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

या निकषांद्वारे अन्न असुरक्षा

जगभरातील लाखो लोकांना पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळते का, अन्न उपलब्धता. शेती उत्पादन, बाजार परिस्थिती, अन्नधान्यांची वाहतूक, किमतींमधील चढ-उतार, वैयक्तिक आर्थिक उत्पन्न, आर्थिक असमानता आदी प्रमुख निकषांच्या आधारे अन्न असुरक्षा निश्चित करण्यात आली आहे.

Story img Loader