गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही बारावीच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत २५ टक्के गूण मिळवण्याच्या तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे.
बारावीच्या लेखी परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांमध्ये २५ टक्के गूण मिळवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मांडण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षी हा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. या वर्षीही २५ टक्के गूण मिळवण्याच्या अटीमधून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना या वर्षीही प्रात्यक्षिक परीक्षेचा आधार मिळणार आहे. नुकतीच झालेली भौतिक शास्त्राची परीक्षा कठीण असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्या पाश्र्वभूमीवर या वर्षीही लेखी परीक्षेमध्ये २५ टक्के गूण मिळवण्याच्या अटीमधून देण्यात आलेली सूट विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरली आहे.