तणाव आणि धकाधकीची जीवनशैली, आठ तासांपेक्षा अधिक कार्यालयीन वेळ, नाश्ता आणि जेवण वेळी-अवेळी घेणे अशा विविध कारणांमुळे स्वत:च्या आरोग्याकडे अनेक नागरिकांचे दुर्लक्षच होते. सकाळी लवकर उठून फिरायला जाणे किंवा व्यायामासाठी खास वेळ देणे अनेकांना शक्य होत नाही. परिणामी शरीरात अतिरिक्त चरबी वाढल्याने लठ्ठपणा येतो. असाच अनुभव मधुरा राजवाडे यांना आला. आहाराचे योग्य नियोजन आणि घरगुती व्यायामप्रकार करुन स्वत:चे वजन कमी केले आणि उत्तम आरोग्याचा अनुभव घेतला. आपल्याप्रमाणेच सर्वसामान्यांनाही असा अनुभव घेता यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी ‘एन्रिच हेल्थ क्लब’ची स्थापना केली आणि त्यातून एका नव्या उद्योगाचा प्रारंभ राजवाडे यांनी केला. योगासने, सूर्यनमस्कार, पोटाचे व्यायाम, अन्नऊर्जेचे व्यवस्थापन यांबाबत त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करतात.

prathamesh.godbole@expressindia.com

Story img Loader