पुण्यातील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये घेतले मर्दानी खेळाचं प्रशिक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवजयंती आणि गणेशोत्सवादरम्यान अनेक तरुण-तरुणींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकल्याचे आपण पाहत आलो आहे. पण, याच मर्दानी खेळाची भुरळ सातासमुद्रापार असलेल्या स्पेन येथील बेले गंधारा आणि इटली येथील ॲरना मारा या तरुणींना पडली; तर या दोन्ही तरुणींनी पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये प्रशिक्षण घेऊन आपल्या मायदेशी रवाना झाल्या आहे.

या प्रशिक्षणाबाबत बेले गंधारा, ॲरना मारा यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, आम्हाला सोशल मीडियावर मर्दानी खेळाचा व्हिडीओ पाहण्यास मिळाला. त्यानंतर आम्ही तब्बल दोन महिन्यांपासून पुण्यातील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा येथील प्रशिक्षकांच्या संपर्कात होतो. त्यानंतर आम्ही दोन दिवसांपूर्वी पुण्यात आलो आणि मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेतले आहे. आम्हाला आणखी खूप काही शिकायचे आहे. हा मर्दानी खेळ खेळून खूप ऊर्जा मिळते आणि स्वतःचं रक्षण करण्याची ताकद मिळते. तसेच आता आम्ही आमच्या देशातील नागरिकांना या खेळाचे प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा >>> गुप्तांगात सोने असलेली कॅप्सुल लपवून तस्करीचा प्रकार उघड…कस्टमकडून ३३ लाखांचे सोने जप्त

तर त्या पुढे म्हणाल्या की, आम्हा दोघींना डान्स करण्याची खूप आवड असून, भारत देशातील विविध राज्यांत वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी आम्हाला भांगडा, लावणी यांसह अनेक डान्स येत असून आम्ही त्याचेदेखील प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशिक्षक विजय आयवळे म्हणाले की, मागील १५ वर्षे शिवाजीनगर गावठाण येथे शिवकालीन मर्दानी युद्ध कलेचे प्रशिक्षण दिले जाते. या आखाड्यामध्ये जवळपास १०० विद्यार्थी विद्यार्थिनी मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेत आहेत. शहरातील अनेक भागांत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रात्यक्षिके सादर केली जातात. यामधून कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा यामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी स्पेन येथील बेले गंधारा आणि इटली येथील ॲरना मारा या दोन्ही तरुणींचा आमच्या सोशल मीडियावर मेसेज आला की, आम्हाला हा खेळ शिकायचा आहे.

हेही वाचा >>> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना विशेष अतिथी दर्जा; पुणे दौऱ्यानिमित्त मंत्रालयातून आदेश

तसेच या खेळाबद्दल त्या दोघी सतत माहिती घेत होत्या. पण, सोशल मीडियावर तेवढे प्रशिक्षण देणे शक्य नव्हते. त्यानंतर बेले गंधारा आणि ॲरना मारा यांनी पुण्यात येण्याचे ठरवले. त्यानुसार दोघी आल्या. मर्दानी खेळाचे बारकावे जाणून घेण्याची धडपड पाहून खूप आनंद वाटला. आपला खेळ सातासमुद्रापार गेल्याने खूप समाधान वाटत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली; तर राहुल मोहिते, वैभव मोहोळ, हर्षदा देशमुख, विनायक सुतार आणि जलाल सय्यद यांनीदेखील प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली.