पुणे : परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. निवड रद्द केलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळण्यासाठी २००३पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. त्यानुसार ७५ विद्यार्थ्यांची ३० ऑगस्ट रोजी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. तसेच ३८ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत होते. मात्र खोटी माहिती सादर केल्याच्या कारणास्तव वर्धा येथील उल्का खोब्रागडे, गोंदिया येथील समीक्षा डोंगरे, रायगड येथील प्राची वानखेडे, पुणे येथील अथर्व कांबळे यांची निवड रद्द करण्याचे समाजकल्याण आयुक्तांनी १३ सप्टेंबर रोजी प्रस्तावित केले होते. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. निवड रद्द केलेले सर्व सर्व विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे आहेत, नमूद करण्यात आले आहे.
परदेशी जाण्यासाठी दिली खोटी माहिती, शिष्यवृत्तीसाठी झालेली निवडच रद्द!
परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-10-2024 at 18:03 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign scholarship of four students cancel as they given false information pune print news ccp 14 css