भक्ती बिसुरे

प्रगतिपथाकडे चाललेल्या आपल्या  देशातील अनेक खेडय़ांत एकीकडे विविध कारणांनी जंगले नष्ट होत असताना एका निसर्गप्रेमी शल्यविशारदाने साठ एकरांवर जंगल वसविण्याची किमया केली. पंचवीस वर्षांची ही ‘तपस्या’ पर्यावरण प्रेमाचे अनुकरणीय उदाहरण ठरावे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा

पुणे जिल्ह्य़ातल्या वेल्हे तालुक्यात गुंजवणी धरणाजवळ धानेप गावाच्या परिसरात डॉ. प्रवीण चोरडिया यांनी हे जंगल वसवले. हे वनक्षेत्र दरवर्षी तीन एकरांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न ते करतात. ईशान्य भारतात एकटय़ाच्या बळावर जंगल उभे केल्याने पद्मश्रीने गौरविले गेलेले यादव पायेंग विख्यात आहेत. त्या धर्तीवर डॉ. चोरडिया यांना महाराष्ट्राचे यादव पायेंग म्हणता यईल.

चोरडिया यांनी गेल्या पंचवीस वर्षांत तब्बल अडीच लाख झाडे लावली, नैसर्गिक संकटांचा सामना करीत त्यातली पंचवीस हजार जगली. २५ वर्षांपूर्वी पावसाळ्यानंतर कोरडी पडणारी कूपनलिका आज बारमाही पाणी देते शिवाय वृक्षलागवडीमुळे प्राणी आणि पक्ष्यांचा सहवास लाभतो.

‘अनेकजण विचारतात, हे तुम्हाला का करावेसे वाटले? मी त्यांना उलट विचारतो, तुम्हाला का नाही करावेसे वाटले?’ असे चोरडिया म्हणाले. आधुनिक जीवनशैलीशी एकरूप होताना आपण निसर्गाशी असलेला ऋणानुबंध विसरतो. विकासाच्या कृत्रिम कल्पनाच आपल्याला जवळच्या वाटू लागतात. याचे नकारात्मक परिणाम कधी आजार तर कधी विनाशाच्या रूपात समोर उभे राहतात. मग आपण खडबडून जागे होतो आणि अंतर्बाह्य़ बदलतो. असाच अनुभव मला या निमित्ताने आला, असे ते नमूद करतात.

नवी पिढी पर्यटन उद्योगात!

डॉ. चोरडिया यांनी वसवलेल्या जंगलाचे त्यांच्या नव्या पिढीने ‘सिरीन इको व्हिलेज’ या कृषी-वन पर्यटन केंद्रात रूपांतर केले आहे. इथे पर्यटनासाठी नको तर निसर्ग सहवासासाठी या असे आवाहन ते करतात. प्लास्टिक, दारू, सिगरेट यांच्यावर इथे बंदी आहे. ज्यांना निसर्गाची ओढ आहे, पाण्याचे झरे, पक्ष्यांची किलबिल आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवाई ज्यांना मोहात पाडते त्यांनीच यावे असा आग्रह चोरडिया कुटुंबातर्फे केला जातो.

शल्यविशारद म्हणून काम करताना अनेक नवीन आजार डोके वर काढताना दिसत होते. त्यामागचे कारण हे बदलत्या आणि बिघडत्या जीवनशैलीमध्ये असल्याचे स्पष्ट होते. हे बदलायचे तर सुरुवात स्वत:पासून करावी या विचारातून मी ओसाड जमीन विकत घेऊन जंगल वसवू लागलो. निसर्गाच्या जवळ गेलो तसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आणि समस्येवरचा तोडगा हा झाडांकडेच असल्याचे जाणवले.

– डॉ. प्रवीण चोरडिया

Story img Loader