पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी नेहमीचे हेवेदावे बाजूला ठेवून रविवारी (२३ ऑक्टोबर) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा आनंद घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात दोन तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते.
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’ या ठिकाणी दिवाळी फराळ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अर्जून पुरस्कार विजेते खेळाडू शांताराम जाधव, नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचीव सचिन साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, भाजप नेते शंकर जगताप, कार्तिक लांडगे, माजी महापौर संजोग वाघेरे, राहूल जाधव, नितीन काळजे, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदींनी हजेरी लावली.