पुणे: पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि पुलाचे लोकार्पण उद्या होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.तर या सोहोळ्यापूर्वी नव्या वादाला सुरुवात झाली असून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित विद्यमान आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यातून लक्ष्य केल्याचे दिसत आहे.२०१४ ते २०१९ च्या कालावधीमध्ये कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना पक्ष नेतृत्त्वाने संधी दिली होती. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी पक्षातील नेत्यांबाबत उघडउघड भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली होती.

त्या घडामोडीनंतर मेधा कुलकर्णी यांना भाजपच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करित नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.पण आता पुन्हा एकदा त्यांना स्थानिक प्रकल्पांच्या उदघाटनपासून दूर ठेवल्याने मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली आहे.आता यावर भाजप मधील नेते मेधा कुलकर्णी यांच्या बाबत काय निर्णय घेतात.हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.या सर्व घडामोडी बाबत मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, या प्रकरणी उद्या भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नेमक काय लिहिले आहे.ते पाहूयात ” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे “माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच ते या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, नामनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

Story img Loader