पुणे: पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे.त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत होते.त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि पुलाचे लोकार्पण उद्या होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.तर या सोहोळ्यापूर्वी नव्या वादाला सुरुवात झाली असून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित विद्यमान आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यातून लक्ष्य केल्याचे दिसत आहे.२०१४ ते २०१९ च्या कालावधीमध्ये कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना पक्ष नेतृत्त्वाने संधी दिली होती. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांनी पक्षातील नेत्यांबाबत उघडउघड भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली होती.
पुणे: भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी पुन्हा नाराज, निमित्त…
केंद्रीय नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या यांच्या उपस्थितीत उद्या होणार कार्यक्रम
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-08-2023 at 20:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former bjp mla medha kulkarni is again upset with the inauguration of chandni chowk bridge svk 88 amy