कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आजारी असताना देखील हेमंत रासने यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पण त्यावेळी गिरीश बापट यांना बोलताना होणारा त्रास, तर नाकात ऑक्सिजनची नळी आणि बाजूला सिलेंडर देखील होता. बापटांच्या या प्रचाराबाबत भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- कसबा पोटनिवडणुकीत आज ‘हे’ उमेदवार चक्क प्रचार करणार नाहीत; कारण…

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
devendra fadnavis vote jihad
“धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

भाजपाचे नेते माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, गिरीश बापटसाहेब १९६८ पासून प्रचारामध्ये सहभागी होत आलेले आहेत. त्यामुळे घोडा किती ही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह किती ही म्हातारा झाला तरी मास खातो. त्यामुळे गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली असल्याचे काकडे म्हणाले.

हेही वाचा- कसबा पोटनिवडणूक: “भाजपाकडून गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ”

गिरीश बापट हे प्रचारामध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नेमक अस काय झाल त्यावर संजय काकडे म्हणाले की,निवडणुका आल्या की,गिरीश बापट साहेब बाहेर पडतात.त्यामुळे गिरीश बापट यांच्यावर कोणीही दबाव आणला नसून स्व खुशीने प्रचारामध्ये आले आहेत. गिरीश बापट एवढे आजारी असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांना भेटायला जायला म्हणजे झाडावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला झाली, असे काकडे