अजित पवार हे पहाटेच्या शपथ विधीला पवार साहेबांच्या सांगण्यावरून गेले होते.अस विधान आज भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.या विधानामधून संभ्रम निर्माण करण्याच काम केले गेले आहे. हा गौप्यस्फोट आज होत असून हे मागील सहा महिन्यात का झाले नाही.तुम्हाला निवडणुकीच्या वेळीच गौप्यस्फोट करण्याची का गरज पडली.हे सर्व धादांत खोट असून अस काही घडल नाही.पवार साहेबांसारख नेतृत्व हे देशाला दिल आहे. ते कधीच अस करणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “भारत जोडणाऱ्या राहुल गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोंदींची…”, नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर घणाघात

आम्हाला पवार साहेबांबद्दल १०० टक्के खात्री आहे.अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात प्रचार सभेत मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच अजित पवार यांनी शपथविधी घेतला होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांच्या विधानांचा समाचार त्यांनी घेतला. कसबा विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली.यावेळी आरपीआय गवई गटाचे प्रमुख राजेंद्र गवई,आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश बागवे,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm ashok chavan campaign for ravindra dhangekar in kasba assembly by election zws 70 svk
Show comments