लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आला तर नंतरच्या विधानसभा निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे. सक्त वसुली संचलनालयाची चौकशी, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा ससेमिरा आणि असमान निधी वाटप थांबवायचे असेल तर भाजपला पराभूत करावेच लागेल. त्याची सुरूवात लोकसभा निवडणुकीपासून होईल, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे गुरूवारी सांगितले.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, गृहखात्याचे अपयश, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेले आरोप, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप याबाबतची भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

आणखी वाचा-भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पटेल समाजाची मागितली माफी, वाचा नेमकं काय घडलं ते….

इंडिया आघाडीत महाविकास आघाडी लढणार आहे. एकास एक उमेदवार देणार आहे. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यातून थोडीफार वादावादी होईल. पण तिन्ही पक्ष चर्चेतून योग्य निर्णण घेतील. लोकसभेत भाजपला पराभूतच करावे लागेल. लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला, तर विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, पुन्हा लोकशाही राहणार नाही, अशी माझी खात्री आहे असे चव्हाण यांनी सांगितले.

ससून रूग्णालयातून पलायन केलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने केलेल्या आरोपाबाबात बोलताना हे प्रकरण सत्ताधारी दडपतील. तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आले. सत्तेतील मंत्र्यांचा सहभाग असल्याने सत्ताधारी प्रकरण दडपतील असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी जमीन हस्तांतणाला विरोध केल्याने त्यांना पुण्यात बदली करू दिली नाही असा उल्लेख बोरवणकर यांनी केला आहे. मात्र त्यांना हवी ती बदली मिळाली नाही त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असावा. मला त्याबद्दद जास्त माहिती नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी बदली मध्ये खूप मोठी प्रकिया असते.त्यामुळे त्याचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल,असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm prithviraj chavan talk about loksabha and assembly elections pune print news apk 13 mrj