पुणे : नांदेड सिटीमधील सदनिकाधारकांचा कायदेशीर हक्क महापालिकेने हिरावून घेतला आहे. सदनिकाधारकांना त्यांचा अधिकार परत मिळेल, असे चित्र असताना सवलत योजना पुढे करून त्यांना लालूच दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हे महापालिकेचे षडयंत्र आहे, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे.

हेही वाचा >>> पुणे महापालिकेचा अजब कारभार : रस्ता सुस्थितीत तरीही दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची होणार उधळण!

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Docandrakant Nimbarte of Congress supports the candidate of the Grand Alliance
काँग्रेसचे डॉ.चंद्रकांत निंबार्ते यांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद

नांदेड सिटीतील १२ हजार सदनिकाधारकांना मिळकतकर आकारणी करण्यात आली असून मिळकतकरातील ४० टक्क्यांच्या सवलतीसाठी सदनिकाधारकांना अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवार (२३ आणि २४ डिसेंबर) तसेच ३१ डिसेंबर (रविवारी) विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी हा आरोप केला आहे. नांदेड सिटीमधील सदनिकाधारकांना सवलत योजनेचा (पीटी-३) अर्ज भरून देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नांदेड सिटीमधील सदनिकाधारकांचा कायदेशीर हक्क महापालिकेने हिरावून घेतला आहे. हा हक्क त्यांना परत मिळेल, अशी परिस्थिती असताना सवलत योजना पुढे करण्यात आली आहे. सवलत योजनेचा अर्ज भरल्यानंतर महापालिकेने केलेली कर आकारणी मान्य आहे, असे लेखी देऊन कायमस्वरूपी कर लादण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या या षडयंत्राला सदनिकाधारकांनी बळी पडू नये, सवलत योजनेचा अर्ज भरून दिला नाही, तर भविष्यात सवलत मिळणार नाही, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे सवलत योजनेवर सदनिकाधारकांनी हरकत नोंदवावी. यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचे या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.