पुणे : माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…पुण्याचे पोलीस आयुक्त संतापले, दलातील बेशिस्तीला चाप लावण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

याबाबत केदार श्रीराम भावे (वय ६४, रा. सुभाषनगर, शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावे ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरातून निघाले होते. सणस मैदानाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी भावे यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. भावे यांनी आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने टिळक रस्त्याकडे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.