पुणे: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा शुक्रवारी संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मृत्यू मागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माला अशोक अंकोला (वय ७७ वर्ष) या माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई आहेत. त्या प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ येथे ‘आदी अपार्टमेंट’इमारतीत एकट्याच मुराहत होत्या. शुक्रवारी सकाळी घरकाम करणारी महिला आली असता दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी जवळच राहणाऱ्या त्यांच्या मुलीला ही माहिती दिली. दरवाजा उघडण्यात आला असता माला अंकोला या रक्ताच्या थरोळात आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची जखम होती. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

हे ही वाचा…Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश

माला गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer salil ankolas mother died suspiciously on friday pune print news rbk 25 sud 02