जजुरी : साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरच्या मल्हारीचं नाव आता मल्हार झटका मटण असं दिले जात असल्यामुळे राज्यातील सर्व मल्हार भक्तांमध्ये तीव्र संताप आहे. मल्हार नाव मटन मास योजनेसाठी वापरण्यास आमचा तीव्र विरोध आहे. शासनाने हे नाव बदलले नाही तर वेळ आल्यास जेजुरीकरांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिला.
जेजुरीच्या खंडेरायाला ” जय मल्हार “असे भावभक्तीने म्हटले जाते व तोच जयघोष आहे. मात्र या नावाने मांस ,मटण किंवा मद्य विक्रीच्या योजनेला “मल्हार सर्टिफिकेशन ” नाव देणे किंवा त्या नावाचे समर्थन ,स्वागत करणे पूर्णपणे अयोग्य आहे .भाविकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे , मार्तंड देवसंस्थान समितीच्या काही विश्वस्तांनी या नावाचे समर्थन व स्वागत करणे चुकीचे असून सध्या धार्मिक संस्थेचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला .याबाबत लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मटण मांस विक्रीसाठी “मल्हार सर्टिफिकेशन “या नावाचे केलेले समर्थन व स्वागत अयोग्य आहे.
भाविकांच्या सोयी सुविधा ,मंदिर गडकोट आवाराचे व्यवस्थापन ,यात्रा उत्सवांचे नियोजन करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयामधून पाच वर्षाकरिता या विश्वस्तांची निवड केली जाते. त्यामुळे त्यांनी धार्मिक संस्थेचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करू नये , वस्त्रसंहितेचा निर्णय असो की मल्हार सर्टिफिकेशनचे समर्थन याबाबत त्यांनी ग्रामस्थ ,खांदेकरी ,मानकरी ,पुजारी वर्गाला विश्वासात घेतले नाही ,किंवा त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही .परस्पर निर्णय घ्यायला विश्वस्त मालक नाहीत.
परंतु सध्या मनमानी कारभार आणि स्वतःची प्रसिद्धी सुरू असून मागील विश्वस्तांच्या काळातील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, भाविकांना बुंदीप्रसाद आदी भाविकांच्या हिताच्या अनेक योजना त्यांनी बंद पाडल्या आहेत. यापूर्वी मी खंडोबा देवस्थानवर नगराध्यक्ष असल्याने पदसिद्ध विश्वस्त होते .आम्ही रुग्णालयासाठी घेतलेल्या जागेवर भक्तनिवास बांधले जात आहे त्यासाठी धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेण्यात आल्याचे समजते .वास्तविक शहरात भाविकांच्या निवासासाठी खंडोबा देवस्थानची धर्मशाळा, पुजारी वर्गाची घरे, भक्त निवास, धर्मशाळा व मोठ्या संख्येने लॉजिंग आहेत .येथील धार्मिक विधी रूढी परंपरा जोपासणाऱ्या पुजारी व ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत.
रुग्णालयाच्या जागेवर भक्तनिवासचे बांधकाम नको, –वीणा सोनवणे
मी नगराध्यक्ष असताना खंडोबा देवस्थान समितीमध्ये पदसिद्ध विश्वस्त होते. यावेळी आम्ही संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावातच भव्य रुग्णालय बांधण्यासाठी ५१ गुंठे जागा खरेदी केली आहे. परंतु नव्याने आलेल्या विश्वस्त मंडळाने रुग्णालयाच्या जागेवर भक्तनिवास बांधण्याचा घाट घातला आहे. येत्या काही काळात राज्य शासना तर्फे सुमारे सहा कोटी खर्चून जेजुरीत. भव्य भक्तनिवास बांधण्यात येणार आहे . त्यामुळे देवस्थानने सुसज्ज रुग्णालयच उभारावे यासाठी वेळप्रसंगी आम्ही न्यायालयातही जाण्याची तयारी ठेवली आहे.